गुंडांचा उच्छाद, नाशिकमध्ये पुन्हा गाड्या जाळल्या

March 23, 2015 6:01 PM0 commentsViews:

nashik 4423 मार्च : नाशिकमध्ये पुन्हा मोटारसायकल जाळ्याच्या घटनेनं डोकंवर काढलंय. शहराती मेरी परिसरातील सप्तऋषी सोसायटीमध्ये 3 मोटरसायकली जाळण्यात आल्यात. या परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी गुंडानी या मोटरसायकली जाळल्या आहेत.

याआधी या सोसायटीमधल्या 2 मोटरसायकली चोरीला गेल्या असून सोसायटी मधलं दुकानही फोडण्याचा प्रकार घडला आहे.गाड्या जाळून दहशत माजवाने गुंडांचा हेतू बनलाय. नाशिकच्या सिडको,नाशिकरोड ,पंचवटी ,द्वारका या भागात गेल्या 4 वर्षात 10 वेळा गाड्या जाळण्याचे प्रकार घडले आहेत. पोलिसांचा गुंडावरील वचक कमी झालाय असा आरोप नागरिक करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close