नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसाठी 22 एप्रिलला मतदान

March 23, 2015 6:53 PM0 commentsViews:

abad and navi mumbai palika23 मार्च : नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. राज्य 22 एप्रिल रोजी दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 एप्रिलला लगेच दुसर्‍या दिवशी मतमोजणी करण्यात येईल. आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार आहे. नवी मुंबईच्या 111 तर औरंगाबाद महापालिकेच्या 113 जागांसाठी निवडणूक होतेय. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज दोन्ही पालिकेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

नवी मुंबई-पक्षीय बलाबल : एकूण जागा- 89

नवी मुंबई 2010 पक्षीय बलाबल
एकूण जागा – 89
राष्ट्रवादी – 55
शिवसेना – 16
काँग्रेस – 13
भाजप – 1
अपक्ष – 4

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल : एकूण जागा- 99
शिवसेना-30
भाजप-15
कॉग्रेस-19
राष्ट्रवादी-11
भारिप-1
आरपीआय-3
मनसे-1
शहर विकास आघाडी-3
अपक्ष-16

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close