अवघ्या हंडाभर पाण्यासाठी गेला तरुणीचा जीव

March 23, 2015 8:53 PM0 commentsViews:

kharda44423 मार्च : राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातल्या खर्डा गावात एका 16 वर्षीय तरुणीचा अवघ्या हंडाभर पाण्यासाठी जीव गेलाय. वंदना डोके असं तीचं नावं आहे. पाण्यासाठी ती विहिरीवर गेली असताना पाय घसरून ती विहिरीत पडली. पाण्यासाठी जीव जाण्याची या गावातली ही सलग तिसरी घटना आहे .म्हणून खर्डा ग्रामस्थांनी आज या घटनेच्या निषेधासाठी कडकडीत बंद पाळलाय.

खडर्‌यामध्ये अवघ्या हंडाभर पाण्यासाठी 16 वर्षीय वंदनाचा जीव गेलाय. याच विहिरीत पडून तीचा मृत्यू झालाय. तिच्या वडिलांचा याच विहिरीत पडून पाय मोडला होता. आणि त्याच विहिरीने वंदनाचा जीव घेतलाय तर दुसरी बहिण काजल जखमी झालीय पाण्यासाठी जीव गेल्याची गावातली ही तिसरी घटना आहे. म्हणूनच खर्डा ग्रामस्थांनी या दुर्घटनेच्या निषेधार्त कडकडीत बंद पाळलाय.

खर्डा हे तसं बर्‍यापैकी मोठं गाव,…म्हणूनच शासनाने या गावासाठी सव्वाकोटी खर्चून दोन दोन पाणी योजना राबवल्या..पण तरीही नळाला काही पाणी आलंच नाही. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्यामुळेच गावाला पाणी मिळू शकलं नाही असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

गावच्या पुढार्‍यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलीय. पण तिथंही प्रशासकीय अधिकारी वेळकाढू पणाचीच भूमिका घेत आहेत.

ही फक्त एकट्या खर्डा गावाचीच रडकथा नाहीये तर जवळपास महाराष्ट्रातल्या बहुतांश गावांमध्ये ही अशीच परिस्थिती आहे.गावकीमधल्या पुढार्‍यांनी पाणी योजनांमध्ये सर्रास भ्रष्टाचार केल्याने गावांमधली पाणीटंचाई काही मिटलीच नाही. म्हणूनच आता तरी मंत्री महोदय आणि प्रशासनाने पाणी योजनांमधल्या भ्रष्टाचाराला चाप लावून ग्रामीण महाराष्ट्रातली पाणीटंचाई दूर करण्याची गरज आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close