बाळासाहेबांचा फोनवरून मतदानाचा आदेश

October 7, 2009 11:28 AM0 commentsViews:

7 ऑक्टोबर शिवसेनेने प्रचाराची एक नवी शक्कल लढवलीय. एका फोन नंबरवरून मतदारांना फोन जातो. मतदार फोन उचलतात. बाळासाहेब ठाकरेंचा आवाज ऐकू येतो. बाळासाहेब फोनवरून सांगतात शिवसेनेलाच मत द्या असा तुम्हाला मी आदेश देतो. जय महाराष्ट्र,माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो.महाराष्ट्रावरती अशी संकटं अनेक वेळा आलीयत.आणि आज ती तीव्रतेने जाणवू लागली आहेत.आणि आज तर निवडणुकीचा मोसम आहे.म्हणूनच यावेळेला एकजुटीने मतदान करून शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करा, असा मी तुम्हाला आदेश देत आहे. त्याप्रमाणे मजबुतीने कामाला लागतील आणि हा गड जिंकल्याशिवाय आणि अबाधित ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत याबद्दल खात्री आहे. जय हिंद ! जय महाराष्ट्र !

close