अलिबागमध्ये तरंगती जेट्टी कलंडली

March 23, 2015 10:08 PM0 commentsViews:

alibag4423 मार्च :अलिबागमधील मांडवा इथली तरंगती जेट्टी कलंडलीय. मरिन फ्रंटायर या कंपनीकडून या जेट्टीचं बांधकाम नुकतंच पूर्ण झालंय. लवकरच या जेट्टीचं उद्घाटन होणार होतं. पण त्यापूर्वीच ही जेट्टी कलंडली आहे.पण उद्घाटनापूर्वीच हा अपघात झाल्यानं आता बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे.

मांडवा इथल्या प्रवासी बंदरावर भरती ओहोटीच्या वेळी बोटी लागण्यास मदत व्हावी म्हणून मेरीटाईम बोर्डाकडून जेटीलगतच्या परिसरात फ्लोटिंग पान्टून अर्थात तरंगत्या जेटीची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे प्रवाश्यांना चढउतार सहजपणे करणे यामुळे शक्य होणार आहे. अशी सुविधा असणारी ही देशातील पहिली वहिली तरंगती जेटी असणार आहे. कंत्राटदार कंपनीनं नुकतंच या तरंगती जेट्टीचं बांधकाम पूर्ण केलंय. सध्या या जेटीची सुरक्षा चाचणी केली जात होती. या चाचणीनंतर जेटी प्रत्यक्ष प्रवाशांच्या वापरासाठी खुली केली जाणार होती. मात्र उद्घाटनापूर्वी तरंगत्या जेटीला अपघात झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close