शशी कपूर यांना ‘फाळके पुरस्कार’ जाहीर

March 24, 2015 1:36 PM0 commentsViews:

shashi-kapoor-hospitalised-due-to-chest-infection24 मार्च : चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आज ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना जाहीर करण्यात आला आहे. शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

शशी कपूर यांनी 1961 मध्ये आलेल्या ‘धर्मपुत्रा’तून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. शशी कपूर यांना 2011मध्ये ‘पद्मभूषण’ या तिसर्‍या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर शंभरहून अधिक सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. चित्रपटसृष्टीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी शशी कपूर यांनी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाले आहेत.

शशी कपूर यांनी दिवार, कभी कभी, सत्यम शिवम सुंदरम, नमक हलाल या चित्रपटातील अभिनयातून त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शशी कपूर यांना दमदार अभिनयासाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close