कवठे महाकाळ इथून निवडणूक अधिकार्‍यांची बदली

October 7, 2009 11:40 AM0 commentsViews: 9

7 ऑक्टोबर आर. आर. पाटील यांच्या सचिवाची कवठे महाकाळ मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेली बदली निवडणूक आयुक्तांनी रद्द केली आहे. अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरुन निवडणुक आयोगाने ही कारवाई केली आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे बाळासाहेब कोळेकर हे पाच वर्षापुर्वी खासगी सचिव होते. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत आर.आर.पाटील यांच्या कवठे महाकाळ मतदार संघात बाळासाहेब कोळेकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. पण निवडणूक निष्पक्षपाती व्हावी, यासाठी कोळेकरांची कवठे महाकाळ इथून बदली करण्याची मागणी अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. पाटील यांच्या या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक निरीक्षकांनाी आपला अहवाल मुख्य निवडणुक आयोगाला पाठवला. या अहवालावरुन कोळेकर यांना ताबडतोब हटवण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहे.

close