राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत ‘मराठी’ची बाजी; ‘कोर्ट’ने पटकावलं सुवर्णकमळ

March 24, 2015 5:42 PM0 commentsViews:

NATIONAL AWARDS MOVIEWS

24 मार्च :  62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर यंदा पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी बाजी मारली असून, चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला. सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘किल्ला’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे.

‘क्वीन’ चित्रपटातील आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला असून, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कन्नड अभिनेते विजय यांना ‘नानू अवन्नला अवळू’ या चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.

पुरस्कार जाहीर झालेल्या चित्रपटांची यादी

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट : चैतन्य ताम्हणे यांचा ‘कोर्ट’
 • सर्वोत्कृष्ट लघुपट : मित्रा (रवी जाधव)
 • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : किल्ला
 • विशेष उल्लेखनिय चित्रपट : किल्ला
 • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : एलिझाबेथ एकादशी
 • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : क्वीन
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगणा राणावत (क्वीन)
 • विशेष उल्लेखनिय पुरस्कार : भूतनाथ रिटर्न्स
 • सर्वोत्कृष्ट संगीत : विशाल भारद्वाज (हैदर)
 • लोकप्रिय चित्रपट : मेरी कोम
 • सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी : बिस्मिल (हैदर)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close