केंद्राकडून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना 2 हजार कोटींची मदत जाहीर

March 24, 2015 9:29 PM0 commentsViews:

indian farmer

24 मार्च : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि अवकाळी प्रश्नांवर राजनाथसिंह यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीला कें द्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, कृषिमंत्री राधामोहन सिंह, रामविलास पासवान उपस्थित होते. दोन ते तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील एका शिष्ठमंडळाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यावरच आज केंद्राने दुष्काळग्रस्तांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने 3 हजार कोटींपेक्षा जास्त मदतीची मागणी केली होती पण सध्या केंद्राने महाराष्ट्राला दोन हजार कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. एनडीआरएफ म्हणजे नॅशनल डिझास्टर रिलिफ फंडकडून ही मदत मिळणार असून यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close