गोव्यात नौदलाच्या विमानाला अपघात, वैमानिकासह अधिकारी बेपत्ता

March 25, 2015 11:58 AM0 commentsViews:

Navy's Dornier aircraft crashes

25 मार्च : भारतीय नौदालचं डॉनिअर जीतचं गस्त घालणारं विमान काल रात्री अकराच्या सुमारास दक्षिण गोव्याजवळील समुद्रात कोसळले. या विमानाचा वैमानिक आणि आणखी एक अधिकारी बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.  तर, एका अधिकार्‍याला वाचवण्यात यश आलं आहे.

नियमित गस्त घालण्यासाठी उड्डाण केलेल्या या विमान रात्री अकराच्या सुमारास गोव्याच्या समुद्रात 25 नॉटीकल मैलावर कोसळले.

ही दुर्घटना पाहणार्‍या स्थानिक मच्छिमाराने शर्थीचे प्रयत्न करून एका अधिकार्‍याला वाचवण्यात यश मिळवले. मात्र, वैमानिक आणि अन्य एक अधिकारी बेपत्ता झाला. आज सकाळपासून नौदलाची दोन विमाने आणि सहा बोटींच्या मदतीने बेपत्ता वैमानिक आणि अधिकार्‍याचा शोध घेण्यात येत आहे. पण अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close