इंदापूरमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकाची हत्या

March 25, 2015 1:46 PM0 commentsViews:

congress corporater killed

25 मार्च : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले इंदापूरचे काँग्रेस नगरसेवक धनंजय वाशिंबेकर यांचे अकलूज इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असताना निधन झाले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे.

धनंजय वाशिंबेकर यांच्यावर काल (मंगळवारी) रात्री वाशिंबेकर यांच्यावर 10-15 जणांनी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर झालेल्या वाशिंबेकर यांना तातडीच्या उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारांसाठी अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांचे निधन झाले. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वाशिंबेकर यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये नगरसेवक म्हणून प्रवेश केला होता. पूर्वीच्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांमनी दिली आहे.

याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close