ऑस्ट्रेलियाला हरवण्याची सुवर्णसंधी – विराट कोहली

March 25, 2015 3:50 PM0 commentsViews:

 

25 मार्च : वर्ल्डकप पूर्वी खराब कामगिरीतून टीम इंडियाने जे शानदार कमबॅक केलंय त्याचं संपूर्ण श्रेय बॉलर्सना जातं असं सांगत सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवण्याची ही योग्य वेळ असल्याचं मत भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने व्यक्त केलं आहे. क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत विराटनं या विजयाचं समीक्षण केलं आहे.

टीम इंडिया सुमारे 3 महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात आहेत. पण ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या टेस्ट सिरीज आणि तिरंगी मालिकेत भारताला एकही मॅच जिंकता आली नाहीये. मात्र, वर्ल्डकप सुरू झाल्यापासून टीम इंडियाचा काही औरचं आहे.

वर्ल्डकपमध्ये आतापर्यंतचे टीम इंडियाने सगळे म्हणजे सातही मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे उद्याच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत केलेल्या पराभवांचा बदला घेण्याचा निर्धार विराट कोहलीने व्यक्त केला आहे.

‘ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी आम्हाला यापेक्षा सुर्वणसंधी कोणतीच मिळणार नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही ऑस्ट्रेलियात ज्या पद्धतीने खेळ केला, त्याला योग्य न्याय देण्यासाठी आम्हाला मिळालेली ही संधी आहेट. असं विराट म्हणाला. त्याचं बरोबर विराटने टीम इंडियाच्या बॉलर्सचंही जोरदार कौतुक केलं आहे. ज्या पद्धतीने बॉलर्सनी आत्मविश्वास आणि आक्रमता दाखवला, त्याने आम्ही जगातील मोठ्या टीम्सना पराभूत करण्यात यशस्वी ठरलो, असंही तो म्हणाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close