विराटला चीअर करण्यासाठी अनुष्का सिडनीत

March 26, 2015 12:21 PM0 commentsViews:

CBAVBbVUQAAUVpy

26 मार्च : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या प्रेमाला पुन्हा बहर आलाय.विराटचा विरह सहन न होऊन शेवटी, आपल्या ‘हीरो’ला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माने थेट सिडनी गाठली आहे. सिडनीत पोहोचताच तिने आपल्या चाहत्यांसह फोटोही काढले.

बीसीसीआयने खेळाडूंना त्यांच्या पत्नी आणि गर्ल्डफ्रेंडबरोबर राहण्यास बंदी घातली होती. मात्र, टीम इंडिया क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाल्यानंतर बीसीसीआयने ही बंदी उठवली.

बीसीसीआयच्या बंदीमुळे याआधी अनुष्काने सिडनीला जाणे टाळले होते. मात्र, सेमी फायनलच्या मॅचच्या एक दिवस आधी आपल्या लाडक्या विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का सिडनीत दाखल झाली आहे. आता मैदानावर सेमी फायनलमध्ये विराटचे चौकार आणि षटकार पाहायला अनुष्कासह विराटचे सगळेच फॅन्स उत्सुक आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close