काँग्रेसचा हात गरीब-मागास जनतेच्या मागे राहील – राहूल गांधी

October 8, 2009 8:39 AM0 commentsViews: 2

8 ऑक्टोबर काँग्रेसचा हात गोरगरीब आणि मागास जनतेच्याच पाठीमागे राहील, असं आश्वासन काँग्रेसचे सरचिटणीस यांनी गुरूवारी महाराष्ट्रातल्या पहिल्या प्रचारसभेत दिलं. पनवेलमधले काँग्रेसचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी पनवेलमध्ये आले होते. पनवेल ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातच ही सभा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे रुग्णालयाच्या परिसरात प्रचार सभा घेता येत नाही. पण इथे हा नियम धाब्यावर बसवलेला दिसला. राहुल गांधी यांची सभा सायलेन्स झोनमध्ये घेतल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही याबाबतची माहिती दिली.

close