वर्ल्डकप जिंकल्यास टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव – बीसीसीआय

March 26, 2015 11:58 AM0 commentsViews:

 CA_0Ry7UIAA3-CU26 मार्च :  टीम इंडियाने यंदाचा वर्ल्डकप जिंकल्यास सर्व खेळाडूंसाठी मोठया बक्षिसांची घोषणा बीसीसीआच्या वतीने करण्यात आली आहे. आज सुरू असलेल्या सेमी फायनल मॅचच्या आधीच ही घोषणा केल्याने खेळाडूंमध्ये उत्साहचं वातावरण आहे.

वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर बुधवारीच सिडनीत दाखल झाले आहेत. खेळाडूंसोबत डिनर घेतल्यानंतर त्यांनी बक्षिसाची घोषणा केली. टीम इंडियाने गेल्यावेळी वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी सर्व खेळाडूंना भरघोस बक्षिस देण्यात आले होते. यावेळीही वर्ल्डकप मायदेशात परत आणल्यास, टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जाईल, अशी घोषणा ठाकूर यांनी या वेळी केली. 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close