अमित देशमुखवर आचारसंहिता भंगाची तक्रार

October 8, 2009 10:09 AM0 commentsViews: 101

8 ऑक्टोबर केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुखवर आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. लातूर शहर मतदार संघातील तिसर्‍या आघाडीचे उमेदवार अण्णाराव पाटील यांच्या बाभळगाव इथल्या सभेत त्यांनी आपल्या समर्थकांकरवी गोंधळ घातला. तसंच वाहनांची तोडफोड केली असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला आहे.

close