अण्णांनी पाठींबा दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात गावकर्‍यांचं उपषोण

October 8, 2009 10:12 AM0 commentsViews:

8 ऑक्टोबर राज्यभरातल्या 15 उमेदवारांना अण्णा हजारेंनी पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांनी पाठिंबा दिलेल्या श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवार राजेंद्र नागावडे वाळू तस्करीतील आरोपी असल्याच सांगत, स्थानिक नागरीकांनी राळेगणसिद्धित उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. राजेंद्र नागावडे हे माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचे चिरंजीव आहेत. ते श्रीगोंदा साखर कारखान्याचे चेअरमन असताना गोडाऊन आणि इंग्लिश मिडियम स्कूल या नावानं भिमा नदीच्या पात्रातून उपसा केल्याचं नागरिकंानी सांगितलं. या संपूर्ण प्रकाराची अण्णा हजारे यांनी चौकशी न करता नागावडे यांना पाठिंबा दिला आहे. अण्णांच्या या भूमिकेविरुद्ध इथल्या स्थानिक नागरिकांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

close