विराटसाठी अनुष्का ठरली ‘अनलकी’

March 26, 2015 3:54 PM0 commentsViews:

CO4eJE

26 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही भारतीय संघातील स्टार क्रिकेटर विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी सिडनीतील मैदानावर दाखल झाली आहे. मात्र, विराटसाठी अनुष्का ‘अनलकी’ ठरल्याचे दिसत आहे.

आजच्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या मॅचमध्ये विराट एका रनवरच आऊट झाला. यावरून अनुष्का विराटसाठी अनलकी ठरल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. तसेच विराटने ऑस्टेलियाचा खेळाडू ब्रॅड हॅडिनचा कॅच देखील सोडला.

यापूर्वी वर्ल्डकपच्या क्वार्टरफायनलमधील भारत आणि बांग्लादेशच्या सामन्यात विराट 3 रनवर आऊट झाला होता. तेव्हा सोशल मीडियावर देखील अनुष्का-विराट यांच्यावरील अनेक जोक सुरू होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close