सध्यातरी निवृत्तीचा कोणताही विचार नाही – महेंद्रसिंह धोनी

March 26, 2015 7:39 PM0 commentsViews:

dhoni6

26 मार्च : वर्ल्डकप 2015 हा धोणीचा शेवटचा वर्ल्डकप आहे, कदाचित ही त्याची शेवटची मॅच असेल, या सगळ्या चर्चांना खुद्द महेंद्रसिंग धोणीने पूर्णविराम लावला आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची शक्यता त्याने फेटाळून लावली. तूर्ततरी वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा आपला विचार नसल्याचं धोनीने स्पष्ट केलं आहे.

सिडनीमध्ये झालेल्या सेमी फायनल मॅचमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून 95 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. वर्ल्डकप मॅचनंतर धोनी निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यावर धोनीने लगेचच निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. मी सध्या 33 वर्षांचा असून अजूनही फिट आहे. त्यामुळे इतक्यात निवृत्त होणार नाही. वन डे आणि टी-20मॅचमध्ये आपण खेळत राहणार असून, 2019 चा वर्ल्डकप खेळायचा की नाही ते पुढच्या टी-20 वर्ल्डकपनंतरच पुढचा निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. धोनीने यापूर्वी टेस्ट मॅचमधून निवृत्ती घेतली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close