‘ते’ विमान जाणूनबुजून पाडण्यात आले – फ्रान्सचा दावा

March 26, 2015 9:04 PM0 commentsViews:

plane crash

26 मार्च : फ्रान्समध्ये जर्मनविंग्ज कंपनीच्या झालेल्या भीषण विमान अपघाताला एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमानाच्या को पायलटने जाणूनबुजून विमान क्रॅश केल्याची माहिती फ्रान्सच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. बर्सिलोनाहून डूसेलडॉर्फ जाताना एअरबस 320 हे विमान मंगळवारी दुर्घटनाग्रस्त झाले होते. यात विमानातील 150 प्रवाशांसह 6 कर्मचारी ठार झाले.

28 वर्षी सहवैमानिक अँड्रिऍस ल्युबिट्झने कॉकपीटचं दार लॉक करुन विमानाचा ताबा घेतला त्यानंतर विमान वेगाने खाली आलं असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. विमानाची नासधूस करणं हे को पायलटनेचं उद्दिष्ट असल्याचं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे, पण त्यामागची कारण अजूनही अस्पष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

या दोन पायलट्समधलं संभाषण रेकॉर्ड झालंय. कॉकपीटमधील व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नोंद झालेल्या आवाजांनुसार शेवटच्या 8 मिनिटांत को पायलटने एक अवाक्षरही काढलं नाही, तर मुख्य पायलटने कॉकपीटच्या बाहेरुन दरवाजा उघडण्याचा सतत प्रयत्न करत राहिला. विमान ज्या वेगाने पर्वतरांगात कोसळलं, त्यानंतर त्याचा चुराडा झाला.

ब्लॅक बॉक्सची संपूर्ण पडताळणी केल्यानंतर अधिकृत बातमी हाती येईल, अशीही माहिती मिळते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close