पुण्यात कुटुंबाने केली सामूहिक आत्महत्या

October 8, 2009 10:15 AM0 commentsViews: 10

8 ऑक्टोबर पुण्यातल्या कोथरूड भागात एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली आहे. दोन मुलांसह त्यांच्या आईवडिलांनी विष घेऊन आत्महत्या केली. कोथरूडमधल्या डी. पी. रोड परिसरातल्या बी. के. अव्हेन्यू बिल्डिंगमध्ये ही घटना घडली आहे. चांदमल छगनमल आगरवाल असं यातल्या कुटुंबप्रमुखाचं नाव आहे. त्यांची पत्नी तसंच 10 वर्षांचा मुलगा विशाल आणि 12 वर्षांची मुलगी करिना यांनीही यात जीव गमावला आहे. मूळचे राजस्थानमधले असलेल्या आगरवाल यांचं पुण्यात सीडी विक्रीचं दुकान आहे.

close