2011 च्या वर्ल्ड कप ग्रुपची घोषणा

October 8, 2009 10:18 AM0 commentsViews: 2

8 ऑक्टोबर 2011 मध्ये होणार्‍या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी दोन ग्रुपची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकुण चौदा टीम्स सहभागी झाल्या आहेत. प्रत्येकी सात टीम्सची ए आणि बी अशा दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानच्या टीम दोन वेगवेगळ्या गटात आहेत. ग्रुप ए मध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियासह, पाकिस्तान, न्यूझीलंड श्रीलंका या टीमचा समावेश आहे. तर झिम्बाव्बे, कॅनडा आणि केनिया या दुबळया टीम्सचाही ग्रुप ए मध्ये समावेश आहे. ग्रुप बीमध्ये भारतीय टीमची लढत असणार आहे ती दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज या तगडया टीम्सशी याशिवाय या ग्रुपमध्ये बांगलादेश, आयर्लंड आणि नेदरलँड या टीम्सचंही आव्हान असणार आहे.

close