‘हिट अँण्ड रन’ प्रकरणी मीडियाने फक्त बातम्या द्याव्यात – सलमान खान

March 27, 2015 2:01 PM0 commentsViews:

salman

27 मार्च : हिट अँण्ड रन प्रकरणी मीडियाने फक्त बातम्या द्यावा पण त्यावर मत व्यक्त करू नये, अशी मागणी बॉलिवूडचा सलमान खान याने कोर्टाकडे केली आहे.

सलमान खानवर मुंबईतील 2002साली दारूच्या नशेत रॅश ड्रायव्हिंग केल्याचा आरोप आहे.  या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सलमान आज सकाळी मुंबई सेशन कोर्टात हजर झाला. यावेळी त्याने कोर्टाकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली.

मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांमुळे निकालाआधीच आरोपी म्हणून प्रतिमा मलीन होत असल्याचा आक्षेप घेत सलमानने सुनावणीदरम्यान मीडियाला कोर्टात हजर राहण्यास बंदीची मागणी केली होती. पण कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

दरम्यान, हिट अँण्ड रन प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी सलमानला आज शेवटची संधी असल्याने या खटल्याच्या सुनावणीकडे बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close