देशात एअर फोर्स डे साजरा

October 8, 2009 10:25 AM0 commentsViews: 10

8 ऑक्टोबर देशात गुरूवारी 77 वा हवाई दल दिन अर्थात एअर फोर्स डे साजरा करण्यात आला. दिल्लीच्या जवळच गुडगावला हवाई दलाची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. एअर चीफ मार्शल पी.व्ही.नाईक यांचं स्वागत तीन हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकानं करण्यात आलं. यानिमित्तानं राजधानीत एअरफोर्सच्या जवानांचं शानदार संचलन आयोजित करण्यात आलं होतं. विविध मोहिमांमध्ये पराक्रम गाजवणार्‍या जवानांचा गौरवही यानिमित्तानं करण्यात आला. 8 ऑक्टोबर 1932 मध्ये स्थापन झालेल्या इंडियन एअर फोर्सने दुसर्‍या महायुद्धात अतुलनीय शौर्य दाखवलं. स्वातंत्र्यानंतरच्या 4 युद्धांमध्येही भारतीय वायुदलानं गौरवास्पद कामगिरी केली आहे.

close