राज्याच्या वाट्याचं पाणी गुजरातला जाणार नाही – गिरीश महाजन

March 27, 2015 1:05 PM0 commentsViews:

27 मार्च : राज्याच्या वाट्याचं थेंबभर पाणीही गुजरातला जाणार नाही, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रसाठी महत्वाचा असल्याचं आयबीएन लोकमतशी बोलताना त्यानी सांगीतलं.

महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या वतीने नारपार-तापी आणि दमणगंगा-पिंजार या दोन नद्या जोडण्याचा प्रकल्प राबवण्यात येतोय. त्यामुळे राज्याच्या वाट्याचं पाणी गुजरातला मिळणार असल्याचा आरोप केला जातोय. त्यावर खुलासा करतं, राज्यातलं पाणी राज्यातच राहणार, गुजरातला यांतील थेंबभरही पाणी जाणार नाही असं स्पष्ट्रीकरणं गिरीश महाजन यांनी केलयं.

काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेत विरोधकांनी नदीजोड प्रकल्पाच्या मुद्यावरून गोंधळ घातला होता. त्यामुळे यासंबंधीचं सादरीकरण विधान परिषदेच्या सभापतींच्या दालनात ठेवण्यात आलं होतं. त्यात सविस्तर हा प्रकल्प मांडण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close