धनगर आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

March 27, 2015 6:35 PM0 commentsViews:

27 मार्च : धनगर आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आज (शुक्रवारी) याचे पडसाद विधीमंडळात बघायला मिळाले. धनगर समाजाला आरक्षण द्यायला किती किती वेळ लागणार, हा प्रस्ताव केंद्राकडे कधी पाठवणार, अशा प्रश्नांनी विरोधकांनी सरकारला घेरलं. त्यावर एकनाथ खडसे यांनी विरोधकांना चिमटे काढले. आमच्यापूर्वी सत्तेवर असणार्‍या सरकारने आरक्षण दिले असते तर, आता ही वेळच आली नसती, असे प्रत्युत्तर खडसे यांनी दिले आहे.

तसंच आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरूवात केल्यावर विरोधकांनी तांत्रिक मुद्दे काढत गोंधळ घातला. यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी आरक्षणासंदर्भात कालावधी निश्चत करण्याची सूचना दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close