सतीश प्रधान शिवसेनेच्या प्रचाराला

October 8, 2009 1:05 PM0 commentsViews: 9

8 ऑक्टोबर ठाण्यात योग्य उमेदवार न दिल्याचा ठपका देत मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या सतीश प्रधान यांनी आता शिवसेनेचा प्रचार सुरु केला आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या राजन विचारे यांचा प्रधान स्वत: प्रचार करत आहेत. मनसेनं उमेदवारी दिलेल्या राजन राजे यांना पराभूत करण्यासाठी प्रधान यांनी आता कंबर कसली आहे. राजे हे महाराष्ट्रद्वेषी असल्याचा आरोप सतीश प्रधान यांनी पक्ष सोडताना केला होता. तर सतीश प्रधान प्रचारात उतरल्यानं राजन विचारे यांनी आपण जिंकणार असल्याचा दावा केला आहे.

close