राज्यातील कार्यकर्ते यादव यांच्या पाठीशी?

March 29, 2015 8:59 AM0 commentsViews:

31medha_patkarnews29 मार्च :दिल्लीत काल (शनिवारी) ‘आप’मध्ये झालेल्या राडयाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. ‘आप’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली, त्याचा निषेध करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यातील ‘आप’चे बहुसंख्य कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मेधा पाटकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षावर घणाघाती टीका केली. पक्षात जो काही तमाशा झाला, यादव आणि भूषण यांना अपमानास्पद वागणूक दिली, त्यामुळे आपण दु:खी झालो आहोत, असे सांगून त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केले. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लढण्याची तयारी आपने सुरू केली होती. परंतु राष्ट्रीय स्तरावर पक्षात पडलेल्या फुटीचे राज्यातही पडसाद उमटले आहेत.

महाराष्ट्रातील प्रामुख्याने समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते आपच्या बाजूने उभे राहिले. त्यांना केजरीवाल यांच्यापेक्षा पुरोगामी चेहरा असलेले योगेंद्र यादव जवळचे वाटतात. ताज्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही आपमध्ये फूट अटळ मानली जात असून बहुतांश कार्यकर्ते यादव यांच्याच बाजूने उभे राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close