ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा ठरली ‘वर्ल्ड चॅम्पियन’

March 29, 2015 3:50 PM0 commentsViews:

champion

27 मार्च : ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे नवीन वर्ल्ड चॅम्पियन ठरले आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या वर्ल्ड कपच्या मेगा फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 7 विकेट्सनं पराभव करत, पाचव्यांदा वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं आहे.

टॉस जिंकून न्यूझीलंडने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पण सेमीफायनलप्रमाणेच फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनं कमाल केली. न्यूझीलंडची सुरुवातच खराब झाली, त्यांच्या धडाकेबाज बॅट्समन ब्रँडन मॅकलम भोपळाही फोडू शकला नाही तर डबल सेंच्युरी ठोकणारा मार्टिन गप्टीलही अवघ्या 15 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. गप्टील आऊट झाल्यानंतर केन विलियमन्सही 12 धावांवर बाद झाला. अवघ्या 40 रन्समध्येच न्यूझीलंडचे आघाडीचे बॅट्समन तंबुत परतल्याने न्यूझीलंडवर कमालीचे दडपण होतचं तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलियन बॉलर्समध्ये उत्साह निर्माण झाला होता.

रॉस टेलर आणि ग्रँट इलियॉटने सेंच्युरी पार्टनरशिप करत इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला खरा. पण तेही फारशी काही करु शकले नाहीत. टेलरने 40 तर इलियॉटनं 83 रन्स केले. पण विल्यमसन, अँडरसन, राँची, व्हिटोरी सगळेच झटपट आऊट झाले. ऑस्ट्रेलियातर्फे आज जेम्स फॉकनर आणि मिचेल जॉन्सननं प्रत्येकी 3 विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिलं. मिशेल स्टार्कने 2 ग्लेन मॅक्सवेलने 1 विकेट घेत न्यूझीलंडचा डाव 183 धावांवर गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियन बॉलर्सना यश आलं आहे.

ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. ऍरन फिंच डकवर आऊट झाला पण डेव्हिड वॉर्नरनं तुफान फटकेबाजी केली. त्याने 45 रन्स ठोकले तर त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं कॅप्टन क्लार्कसोबत कमालीची पार्टनरशिप केली आणि टीमला विजय मिळवून दिला. क्लार्कने तुफानी इनिंग खेळत 74 तर स्मिथनं नॉटआऊट 56 रन्स केले.

ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क वर्ल्डकप 2015 मधील ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ ठरला आहे. मिशेलने आठ मॅचमध्ये 10.18च्या सरासरीने 22 विकेट घेतल्या आहेत. तर मार्टीन गुप्टिल हा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक म्हणजे 547 धावा करणारा बॅट्समन ठरला आहे. याशिवाय जेम्स फॉकनर मॅन ऑफ द मॅच ठरला आहे.

दरम्यान, पाचव्यांदा वर्ल्डकप पटकावणार्‍या ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन मायकल क्लार्कने आजचा विजय फिलीप ह्यूजला समर्पित केला आहे. या वर्ल्डकपमध्ये आम्ही 16 खेळाडू घेऊन खेळलो, आज फिलीप असता तर आज तोदेखील आमच्यासोबत जल्लोष करत असता अशी भावनिक प्रतिक्रिया मायकल क्लार्कने दिली आहे.

 वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया

# 1987 : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड
– ऑस्ट्रेलियाचा 7 रन्सनं विजय

# 1999 : ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान
– ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटनं विजय

# 2003 : ऑस्ट्रेलिया वि. भारत
– ऑस्ट्रेलियाचा 125 रन्सनं विजय

# 2007 : ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका
– ऑस्ट्रेलियाचा 53 रन्सनं विजय

# 2015 : ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
– ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटनं विजय

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close