‘फुलराणी’ने रचला इतिहास

March 29, 2015 9:58 AM0 commentsViews:

Saina-Nehwal-creates-histor

29 मार्च : ‘भारताची फुलराणी’ अशी बिरुदावली मिरवणार्‍या सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठलं आहे. जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांकांवर पोहोचणारी पोहोचणारी सायना पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. यापूर्वी 1980 साली प्रकाश पदुकोण यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं होतं. बॅडमिंटन विश्वात सातत्यपूर्ण प्रदर्शनासह आता क्रमवारीत अव्वल स्थान गाठत सायनाने भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला. क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्यासाठी सायनाला दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत विजय मिळवणे आवश्यक होते. सायनाने स्पेनच्या कॅरोलिना मरीनचा पराभव करत अव्वल स्थानी बढती पक्की केली आहे. अव्वल स्थान गाठल्यावर सायनाने ट्वीटरवर आनंद व्यक्त केला. दरम्यान, सायनाने या विजयासह पहिल्यांदाच इंडिया ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close