मुंबईत 20 टक्के कपात?

March 29, 2015 6:10 PM0 commentsViews:

29 मार्च : ठाण्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन काल (शनिवारी) फुटल्यामुळे लाखो लीटर पाणी तर वाया गेलंच आहे. पण त्याशिवाय मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात होण्याची शक्यता आहे.

ठाण्याच्या किसननगरजवळच्या गांधीनगरमध्ये ही पाईपलाईन फुटली आहे. या प्रलयामुळे बाधित झालेल्या रहिवाशांना पालिकेच्या शाळा आणि सनराईज बिझनेस पार्कमध्ये स्थलांतरीत करण्यात आलं आहे. कित्येक झोपड्या वाहून गेल्यात. 15 कुटुंबांना रेंटल हाऊसिंग स्कीमच्या घरांमध्ये निवारा देण्यात आला आहे. पाईपफुटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तहसिलदार कार्यालयाकडून सुरू आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून घटना स्थळी पाण्याच्या दबावामुळे 10 फुटांचा खड्डा पडला होता . या जलवाहिनीच्या अपघातामुळे हजारो घरात पाण्यासोबत गाळही घुसला आहे.

दरम्यान, काल दुपारी झालेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे 50 जण जखमी झालेत. त्यातील 18 जणांवर तीन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, एकच व्यक्ती जखमी असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close