‘ली कुआन यू’ यांना अखेरचा निरोप

March 29, 2015 2:23 PM0 commentsViews:

29 मार्च : सिंगापूरने साश्रू नयनांनी आज (रविवार) देशाचे पहिले पंतप्रधान ‘ली कुआन यू’ यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

‘ली कुआन यू’ यांचं गेल्या आठवड्यात वयाच्या 91व्या वर्षी निधनं झालं. आज सिंगापूरमधल्या रस्त्यांवरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जगातील अनेक नेते उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान शिझो ऍबे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन हेही ‘ली कुआन यू’ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close