मनसेची ऍलर्जी नाही – अजित पवार

October 9, 2009 8:57 AM0 commentsViews: 2

9 ऑक्टोबर आपल्याला राज ठाकरेंच्या मनसेची ऍलर्जी नाही असं विधान राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी केल आहे. एक प्रकारे मनसेला त्यांनी मनसेला आवतणचं दिलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यामुळे मतमोजणीनंतरच्या मोडतोडीच्या राजकारणाला आताच सुरुवात झालेली दिसत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी वेळ पडली तर विरोधी बाकांवर बसू पण अपक्ष आणि बंडखोरांच्या मदतीनं सरकार स्थापन करणार नाही.असं म्हंटलं आहे. मुरबाड इथे किसन काथोरे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत आर. आर. पाटील बोलत होते. पक्षाशी आणि जनतेशी एकनिष्ठ न राहणार्‍या बंडखोर, अपक्षांना खड्यासारखं बाजूला करा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

close