सिद्धराम म्हेत्रे यांना सुप्रिम कोर्टाचा दिलासा

October 9, 2009 8:58 AM0 commentsViews: 3

9 ऑक्टोबर सिद्धराम म्हेत्रे यांना सुप्रिम कोर्टानं दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत म्हत्रेंना अटक न करण्याचा कोर्टानं आदेश दिला आहे. अक्कलकोट गोळीबार प्रकरणी सिद्धराम म्हेत्रे यांचा अटकपूर्व जामीन हायकार्टाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. अर्ज सोलापूर सेशन कोर्टानं फेटाळल्यानं त्यांनी मंुबई हायकोर्टात धाव घेतली होती. सिध्दराम म्हेत्रे यांच्यासह त्याचे भाऊ शंकर म्हेत्रे यांच्यावर खुनाचा आरोप आहे. या प्रकरणी शंकर म्हेत्रे यांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. अक्कलकोट शेगाव येथे 26 सप्टेंबर रोजी भाजपच्या प्रचार सभेत झालेल्या गोळाबारात भाजपचा कार्यकर्ता ठार झाला होता. हा हल्ला सिध्दराम म्हेत्रे याच्या सांगण्यावरूनच करण्यात आला अशी पोलिसात तक्रार केल्यानं म्हेत्रे भावावर हा खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सिध्दराम म्हेत्रे अक्कलकोट मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

close