बीएमसीला ठेकेदारांचा विळखा?

March 30, 2015 2:55 PM0 commentsViews:

30 मार्च : मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतुदी ठेकेदार करताहेत का? मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहारात कंत्राटदारांचं वर्चस्व आहे का? कुठल्या नगरसेवकाला किती निधी द्यायचा, हे ठेकेदार ठरवत असल्याचा धक्कादायक खुलासा एका ऑडियो क्लीपच्या माध्यमातून समोर आला आहे. स्वत: मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना ठेकेदारानं पत्र दिल्याचं मान्य केलं आहे.नगरसेवकांना त्यांच्या वार्डात काम करण्यासाठी शंभर कोटी रुपयांची सुधारणा करण्याचा अधिकार महापौरांना असतो. या संभाषणात याच शंभर कोटी रुपयांबद्दल स्नेहल आंबेकर मनसेचे गटनेता संदीप देशपांडे यांच्याशी बोलतांना ऐकु येताहेत. या ऑडियो क्लिपमची सत्यता आम्ही पडताळलेली नसली तरी संदीप देशपांडे यांनी मात्र हा संवाद त्यांच्या आणि महापौरांच्या दरम्यान झाल्याचं मान्य केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close