‘हिट अँण्ड रन’ प्रकरणातून सलमान खानला दिलासा?

March 30, 2015 3:49 PM0 commentsViews:

Hit and run salman

30 मार्च : अभिनेता सलमान खान आरोपी असलेल्या ‘हिट अँण्ड रन’ प्रकरणाला सोमवारी नवं वळण मिळालं आहे. अपघातावेळी सलमान खान गाडी चालवत नव्हता तर मी चालवत होतो, अशी कबुली सलमान खानचा ड्रायव्हर अशोककुमार सिंहने कोर्टात दिली. त्यामुळे ‘हिट अँण्ड रन’ प्रकरणातून सलमान खानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

वांद्रे इथे 2002 साली घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झाली असून आज सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंग याची साक्ष घेण्यात आली. तेव्हा त्याने आपणच गाडी चालवत असल्याचे कबूल केले. मी पोलिसांनाही तोच जबाब दिला होता, मात्र ते आपलं काहीही ऐकण्यास तयार नव्हते असेही सिंग यांनी म्हटलं. या खटल्याची अंतिम सुनावणी एक एप्रिलपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, सिंग यांच्या या कबुलीमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची चिन्हं आहेत. 2002 साली घडलेल्या या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close