राज्यात अवकाळी पावसामुळे आंब्याचं नुकसान

March 30, 2015 6:11 PM0 commentsViews:

Mango nfna30 मार्च : राज्यात काल (रविवार) झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव आणि धुळ्यात वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीमुळे आंब्याचे मोहोर गळून पडलेत.

मुक्ताईनगर तालुक्यात काल संध्याकाळी झालेल्या गारपीट आणि वादळी वार्‍याने आतापर्यंत शिल्लक राहिलेल्या आंब्याचे मोहोरही गळले. याचा शेतकर्‍यांना सर्वात मोठा फटका बसलाय. तसंच आंब्यांच्या भावावरही याचा परिणाम होणार आहे. महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्या शेतीतही आंब्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी स्वत: महसुल मंत्र्यांनी आपल्या ट्रॅक्टरने शेतीतील नुकसानीची पाहणी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close