निवडणुकीसाठी जादूटोण्याचा आधार?

March 31, 2015 4:15 PM0 commentsViews:

विनय म्हात्रे, नवी मुंबई
31 मार्च : राजकारणात विजयासाठी कोणतीही पातळी गाठली जाते, याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. पण नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एक भलताच प्रकार समोर आलायं. उमेदवाराचं चक्क जादूटोणा, करणी, भानामती अशा गोष्टींचा आधार घेत असल्याचं समोर आलयं.

नवी मुंबईतील ऐरोली मध्ये राहणारे भाऊसाहेब वाळुंज तब्बल वीस वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहेत. यावेळी त्यांना निवडणुकीसाठी उभं राहण्याची संधीही मिळाली पण जादूटोणा-करणीच्या भीतीमुळे त्यांनी निवडणुकीत न लढण्याचा निर्णय घेतलाय. केवळ भाऊसाहेव वाळुंजच नाहीत तर इतरही अनेक उमेदवार या मनपा निवडणुकीत जादूटोण्याचा वापर होत असल्याचा दावा करतायेत.

यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार केवळ सातारा, सांगली, कोकण इथल्या भोंदूबाबांकडेच नाही तर पार हैदराबाद, चेन्नई, कर्नाटक इथल्या भोंदूबाबांकडे खेपा घालतायेत. नवी मुंबईतील उमेदवार विकासापेक्षा जादूटोण्यासारख्या मार्गाचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावरून दिसून येतंय. अशा पद्धतीनं अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या नेत्यांच्या हातात सत्ता सोपवायची की आपलं नेतृत्व चोखंदळपणे निवडायचं याचा निर्णय आता मतदारांनीच जागरुकपणे घ्यायला हवं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close