पाणी शोधण्यासाठी चंद्रावर नासा करणार स्फोट

October 9, 2009 12:42 PM0 commentsViews: 5

9 ऑक्टोबर चंद्रावर पाणी असण्याचे पुरावे नुकतेच चांद्रयानाला मिळाले आहेत. मात्र चंद्रावर पाण्याचं नेमकं प्रमाण किती याचा शोध नासा घेत आहे. त्यासाठीच शुक्रवारी संध्याकाळी नासा चंद्रावर बॉम्बहल्ला करणार आहे. हा हल्ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केला जाणार आहे. रॉकेटने हा हल्ला केला जाणार आहे. सॅटेलाईटमार्फत या हल्ल्याची दृश्य पृथ्वीवर पाठवली जाणार आहेत. गोदार्द स्पेस फ्लाईट सेंटरचे मुख्य शास्त्रज्ञ जिम गारविन यांनी हा प्रयोग अंतराळातील पर्यावरणाची हानी करणार नसल्याचं म्हटलं आहे.

close