सिगारेटमुळे कॅन्सर होत नाही- दिलीप गांधी

March 31, 2015 8:41 PM3 commentsViews:

adasldha

31 मार्च : भारतात सिगारेटमुळे कॅन्सर होत असल्याचे कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. यासंबंधीची जी काही सर्वेक्षणं आहेत ती सगळी परदेशातली आहेत. त्याचा भारताशी काहीही संबंध नाही त्यामुळे सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवरचा आरोग्यास हाणीकारक हे वैधानिक इशार्‍याचं पोस्टर आकाराने मोठं करण्याची काहीही गरज नाही, असा जावईशोध अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी लावला आहे.

‘तंबाखूमुळे कॅन्सर होतो यावर भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा अभ्यास करण्यात आला नाही. याबाबत परदेशात सर्वेक्षणं करण्यात आला आहे. त्यामुळे यासंबंधी भारतीय दृष्टीचाही विचार करणं गरजेचं आहे.’ असंही ते पुढे म्हणाले. भाजपचे खासदार असलेले गांधी यांनी वैधानिक इशार्‍याचा आकार वाढवायला विरोध केला आहे. तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत सर्वांचे एकमत आहे. तरीही त्याबाबत कोणत्याही भारतीय सर्व्हेमध्ये तंबाखूमुळे कॅन्सर होतो असं दिसून आलेलं नाही. सर्व अभ्यास हे भारताबाहेर करण्यात आलेले आहेत. कॅन्सर हा केवळ तंबाखूमुळेच होत नाही. भारतात यावर अभ्यास करणं आवश्यक आहे. याबाबत 4 कोटी बिडी उत्पादकांचाही विचार व्हावा, असंही गांधी पुढे म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारमध्ये मतभेद असून जावडेकरही गांधींशी असहमत असल्याच म्हटलं आहे. सिगारेट उत्पादकांच्या लॉबीकडून सरकारवर दबाव निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर सरकारचा निर्णय धक्कादायक आणि दुदैर्वी असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

आपल्या राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील याचं निधन हे तंबाखू खाण्यामुळे झाल्याचं सर्वांनाच माहिती आहे. पण केवळ तंबाखूमुळे कॅन्सर होतो, असं खासदार दिलीप गांधींना अजिबात वाटत नाही. किंबहुना तसा रिपोर्टच त्यांनी केंद्र सरकारला सादर केला आहे. त्यांचा हा जावई शोध ग्राह्य धरूनच केंद्र सरकार म्हणे तबांखूजन्य पदार्थांवरचं वैधानिक इशार्‍याचं चित्राचा आकार आहे तेवढात ठेवणार आहेत. पण यानिमित्ताने केंद्रातलं हे तंबाखू उत्पादक लॉबीपुढे झुकल्याचं पुन्हा सिद्ध झालं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ganesh Sathe

    Yala Mhanatat KHASDAR ! Ale Jagyavar !!

  • Yatish Madhavi

    mag te padharth tax free karun taka

  • Yatish Madhavi

    4 कोटी बिडी उत्पादकांचाही विचार व्हावा ya shathi tax free kara

close