जाहिरातीमुळे सेना-भाजप युती अडचणीत

October 9, 2009 12:45 PM0 commentsViews: 3

9 ऑक्टोबर भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांनी वृत्तपत्रांमध्ये दिलेली एक जाहिरात त्यांना अडचणीत आणणारी ठरली आहे. शुक्रवारच्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये सरकार कसं हवं या मथळ्याखाली त्यांनी महागाईच्या विरोधात संदेश देणारी ही जाहिरात दिली आहे. पण, या जाहीरातीत त्यांनी वापरलेल्या फोटोंमुळे ते अडचणीत आलेत. कारण, हा फोटो कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर आणि तारा रेड्डी यांच्या आंदोलनाचा आहे. सत्तरच्या दशकात महागाईच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षांनी काढलेल्या थाळी आणि लाटणे मोर्चांचा हा फोटो आहे. आमच्या नेत्यांचा असा फोटो कसा वापरला जाऊ शकतो हे विचारत आता कम्युनिस्ट पक्षाने या जाहिरातींवर आक्षेप घेतला आहे.

close