कोळसा घोटाळाप्रकरण : मनमोहन सिंग यांच्याविरोधातील समन्सला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

April 1, 2015 12:06 PM0 commentsViews:

ËÖê¸üManmohan

01 एप्रिल : कोळसा खाणवाटप गैरव्यवहारप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बजावण्यात आलेल्या समन्सला सुप्रीम कोर्टाने आज (बुधवारी) स्थगिती दिली. त्यामुळे येत्या 8 एप्रिल रोजी डॉ. मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून कोर्टात हजर राहण्याची गरज पडणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मनमोहन सिंग यांना काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 11 मार्च रोजी सिंग यांना ‘आरोपी’ ठरवत समन्स धाडले होते. मनमोहन सिंग यांच्याबरोबर कुमारमंगलम बिर्ला, कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सचिव पीसी पारेख यांच्याविरोधातील समन्सलाही स्थगिती देण्यात आली.

कुमारमंगलम बिर्ला यांच्या ‘हिंदाल्को समूहास’ ओडिशातील तालिबारा 2 आणि 3 मधल्या खाणींचं वितरण करण्यात आलं होतं. यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. या काळात पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या हाती कोळसा मंत्रालयाचा कारभार होता. त्यामुळे सीबीआयने याप्रकरणी मनमोहन सिंहांची चौकशीही केली होती. त्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मनमोहन सिंह यांना कोळसा घोटाळा प्रकरणी समन्स बजावले होते. तसंच 8 एप्रिलला त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेशही दिले होते. याच समन्सला सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती दिली असून सीबीआयला उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी खुद्द सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मनमोहन सिंह यांच्या निवासस्थानापर्यंत ‘समर्थन यात्रा’ काढली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close