नक्षलवादी हल्याचा निवडणुकांवर परिणाम नाही- जयंत पाटील

October 9, 2009 12:47 PM0 commentsViews: 56

9 ऑक्टोबर गुरूवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा निवडणुकांवर परिणाम होणार नाही. आमच्याकडे पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे, असा विश्वास गृहमंत्री जयंत पाटील यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांशी लढताना 17 पोलीस शहीद झाले होते. या सर्व शहीद पोलिसांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आले. तिथे पोलीस मुख्यालयासमोर या शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. गृहमंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री नितीन राऊत हे यावेळी उपस्थितीत होते.

close