उन्हात आंदोलन केलं तर काळ्या व्हाल – लक्ष्मीकांत पार्सेकर

April 1, 2015 2:15 PM0 commentsViews:

laxmikant_parsekar01 एप्रिल :  गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या वक्तव्यानं पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडलंय. आंदोलनाला बसलेल्या नर्सना त्यांनी उन्हात आंदोलन करू नका, उन्हात आंदोलन केल्यावर त्वचा काळवंडेल त्यामुळे चांगली स्थळं मिळणार नाहीत, असा अजब सल्ला दिलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. या वक्तव्यामुळे प्रतिगामी पुरुषी मानसिकता पुन्हा एकदा अधोरेखित झालीय. या आधी त्यांनी समलैंगिक व्यक्तींना बरं करण्यासाठी केंद्रांची स्थापना करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close