गिरीराज यांच्या वर्णद्वेषी वक्तव्याविरोधात काँग्रेसची निदर्शनं

April 2, 2015 2:03 PM0 commentsViews:

Congress Progeast

02 एप्रिल : सोनिया गांधींबद्दल मुक्ताफळं उधळणार्‍या केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. देशभर रस्त्यावर उतरुन गिरीराज सिंहांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. त्यामुळे गिरीराज सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौर्‍यावर आहेत त्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वात निदर्शनं करण्यात आली आणि सिंहांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी संजय निरुपम यांच्यासह सर्वच आंदोलकांना ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकत्यांनी नवी दिल्लीत गिरीराज सिंग यांच्या घराबाहेर निदर्शनांना सुरुवात केलीय. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठिमारही केला. तर बंगळुरूमध्येही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close