येमेनमधील 350 भारतीय मुंबई, कोचीला परतले

April 2, 2015 1:44 PM0 commentsViews:

Yemen,Mumbai

02 एप्रिल : येमेनमधून सुटका करण्यात आलेले 349 भारतीय नागरिक आज (गुरुवारी) पहाटे मुंबई आणि कोचीमध्ये परतले. भारतीय नौदल आणि परराष्ट्र मंत्रालयाने या भारतीय नागरिकांना सुखरूप भारतात आणले.

येमेनमध्ये अडकलेल्या सुमारे 4 हजार नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन राहत’ ही स्वतंत्र मोहिम सुरू केली आहे. त्यानुसार येमेनमधील ऍडन बंदरावरून नौदलाच्या आयएनएस सुमित्रामधून मंगळवारी रात्री या भारतीय नागरिकांना जिबुती इथे आणण्यात आलं. जिबुतीहून भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आज सकाळी या भारतीयांना भारतात आणण्यात आले. भारतात दाखल होताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. सुटका करण्यात आलेल्या भारतीयांमध्ये 220 पुरूष, 101 महिला आणि 28 लहान मुलांचा समावेश आहे.

आज सकाळी 190 भारतीयांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी मंत्री प्रकाश मेहता व खासदार किरीट सोमय्या विमानतळावर उपस्थित होते. तर, कोची विमानतळावर 168 नागरिकांना घेऊन विमान दाखल झाले. भारतात परतलेल्या नागरिकांमध्ये नर्सची संख्या सर्वाधिक आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close