राणेंच्या मदतीची बंडखोराला अपेक्षा

October 10, 2009 8:35 AM0 commentsViews: 2

10 ऑक्टोबर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रवीण भोसले यांनी आपल्याला नारायण राणे यांची मदत मिळू शकते असं विधान केलं आहे. भोसले यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी राणे यांची भेट घेतली होती. मराठा समाजाच्या मतांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. असा भोसलेंचा दावा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दीपक केसरकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.

close