डोंबिवली-मुंब्रादरम्यान रेती माफिया करतायेत खारफुटींची कत्तल

April 2, 2015 6:54 PM0 commentsViews:

02 एप्रिल : मुंब्रा ते डोंबिवली रेल्वेलाईनलगत मोठ्या प्रमाणात खारफुटी असून या खारफुटींची रेती माफियांकडून कत्तल केली जातेय. मोठ्या प्रमाणात असेलेलं खारफुटीचे जंगल आता गायब होऊ लागलंय. कोपर आणि दिव्यादरम्यान रेती काढण्यासाठी सर्रास सक्शन पंप आणि मोठ मोठे ट्रॉलर वापरले जात आहेत. खारफुटीची कत्तल होत असल्याने भरतीच्या वेळी खाडीतील पाणी रेल्वे रूळांना लागत आहे. यामुळे रेल्वे रूळांना धोका निर्माण झाला आहे. यावर दिवसा किरकोळ कारवाई होत असली तरी सरकार यांत्रणांना यावर लगाम लावण्यात यशं आलेलं नाही. पण रात्रीच्या आंधारात पुन्हा उत्खनन सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close