विनायक निम्हण यांचा भाजपवर अपप्रचाराचा आरोप

October 10, 2009 8:39 AM0 commentsViews: 6

10 ऑक्टोबर युतीचा उमेदवार असताना प्रचारासाठी वापरलेली पत्रकं आता विरोधक माझ्याच विरोधात वापरत आहेत. असा आरोप पुण्यातल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार विनायक निम्हण यांनी केला आहे. भाजपचे विकास मठकरी असा चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोप निम्हण यांनी पत्रकार परीषद घेऊन केला. मठकरींच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करणार असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं.

close