गिरीराजांविरूद्ध एफआयआर दाखल करा!

April 2, 2015 9:40 PM0 commentsViews:

Giriraj

02 एप्रिल : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर वर्णभेदी टीका करणारे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरीराज सिंह यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश बिहारमधील कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे गिरीराज आणखीनच गोत्यात येण्याची शक्यता आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणार्‍या गिरीराज यांनी सोनिया गांधींना लक्ष्य करताना नव्या वादाला तोंड फोडले होते. ‘राजीव गांधी यांनी गोरा रंग नसलेल्या कुणा नायजेरियन महिलेशी विवाह केला असता, तर काँग्रेसने त्या महिलेचे नेतृत्व वस्वीकारले असते काय,’ असा ‘वाचाळ’ सवाल गिरीराज यांनी काल केला होता. त्यांच्या या विधानाचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलन छेडले आहे. गिरीराज यांना अटक करा, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी होत आहे. त्याचवेळी बिहारमधील संजय कुमार सिंह या काँग्रेस कार्यकर्त्याने थेट न्यायालयात याबाबत तक्रार करून गिरीराज यांना आव्हान दिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close